बेळगाव : जुने बेळगाव येथील निराधार केंद्रामधील 75 वर्षीय शारदा कट्टीमनी यांचा सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शारदा या गेल्या दीड वर्षापासून या निराधार केंद्रामध्ये वास्तव्यास होत्या त्या एकट्याच होत्या. त्यांना त्यांच्या कुटुंबाचा आधार नव्हता. गेल्या दीड वर्षापासून केंद्रामध्ये शारदा या सर्वांशी मिळून मिसळून राहत होत्या. येथील कर्मचाऱ्यांनी त्यांची चांगल्यारित्या देखभाल केली होती पण त्यांची सोमवारी सायंकाळी हृदयविकाराने प्राणज्योत मालवली. त्यांच्या अंतिम यात्रेसाठी आश्रममधील कर्मचाऱ्यांनी समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांच्याशी संपर्क साधून मदतीची हाक मारली. त्यावेळी माधुरी जाधव या आपले सहकारी शुभम दळवी, विनय पाटील, रोहित चौगुले यांच्यासह तेथे पोहोचल्या आणि शारदा यांच्या अंत्यविधीचा स्वखर्च उचलत माधुरी जाधव यांनी सदाशिवनगर येथील स्मशानभूमीमध्ये त्या आजींचे अंत्यसंस्कार केले आणि आजींचा आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना केली. या कार्यासाठी शंकर कांबळे आणि यल्लाप्पा कांबळे यांनी सहकार्य केले.
