बेळगाव : शहर व उपनगरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षांची बैठक मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने गुरूवार दि. १५ जुलै रोजी सायंकाळी ५ वा. सिद्धजोगेश्वर मंदिर (शनिमंदिर जवळ) बोलाविली आहे. तरी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन रणजीत चव्हाण पाटील अध्यक्ष, रमाकांत कोंडुसकर कार्याध्यक्ष, शिवराज पाटील सरचिटणीस यांनी केले आहे.
