बेळगाव : “एक हात मदतीचा”आज महागाईचा भस्मासुर फोफावत चालला आहे. त्यात घरगुती साहित्य, गॅस दर, इंधन ऑईल खाद्य तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.
त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. तसेच हाताच्या बोटावर जगणाऱ्या नागरिकांना जगायचे कसे हा प्रश्न उद्भवला आहे. त्यामुळे या सर्वाचा विचार करून वन टच फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल फोंडू पाटील यांनी आपल्या ऑटोनगर येथील “विठ्ठल फर्निचर वर्क्स” या शोरूम मधील लाकडी कापीव जळाव अवघ्या दोन ते अडीज रुपये प्रति किलो या दराने देऊ केले आहे.
ना नफा या फायदा या माफक दराने ते देत आहेत. दुसरीकडे याचा दर 4 ते 5 रुपये प्रति किलो असा आहे. त्यामुळे कोणत्याही गरीब आणि गरजू कुटुंबियांना किंवा व्यक्तींना स्वयंपाकासाठी या लाकडी जळाची गरज असेल त्यांनी ते घेऊन जावे असे आवाहन करण्यात आले आहे.
याकरिता 8884640133 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta