Wednesday , March 4 2026
Breaking News

माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन, गुरुवंदना उत्साहात संपन्न

Spread the love

बेळगाव : कंग्राळी खुर्द येथील आदर्श मराठी मुला-मुलींची शाळा आणि मार्कंडेय हायस्कूलमधील माजी विद्यार्थ्यांतर्फे आयोजित मैत्री स्नेहसंमेलन व गुरुवंदना कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला पडला.
कंग्राळी रोड जाफरवाडी येथील श्री समर्थ मंगल कार्यालयामध्ये रविवारी या संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर या कार्यक्रमात उपस्थित माजी विद्यार्थ्यांच्यावतीने शाळेच्या शाळेच्या आजी माजी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे जवान प्रवीण तिरवीर, गुरुनाथ पाटील, सेवानिवृत्त जवान संदीप रेडेकर आणि राजाराम पाटील यांचा श्रीफळ आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांनीही समयोचित विचार व्यक्त केले.
सदर मैत्री स्नेहसंमेलन व गुरुवंदना कार्यक्रमास शैक्षणिक पर्व सन 1982 ते 1992 या सालातील पहिली ते दहावी इयत्तेपर्यंतचे विद्यार्थी -विद्यार्थीनी उपस्थित होते. परगावी असलेल्या विद्यार्थ्यांनी देखील कार्यक्रमास आवर्जून हजेरी लावली होती. योगायोगाने रविवारी शटुप्पा राजाई या माजी विद्यार्थ्यांचा वाढदिवस असल्यामुळे तो वाढदिवस देखील केक कापून धडाक्यात साजरा करण्यात आला. वैशाली मुतगेकर आणि यल्लूप्पा बाळेकुंद्री यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत पाटील, रमेश पाटील, संजय मोहनगेकर, बळीराम पाटील आणि गुंडूली पाटील यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *