Monday , April 14 2025
Breaking News

अथणी तहसील कार्यालयावर एसीबीची धाड

Spread the love

अधिकाऱ्यांकडे अनेक तक्रारी

अथणी : सर्वसामान्य जनतेची शासकीय कामे करण्यास विलंब लावणे, महत्त्वाची कागदपत्रे देण्यास वेळ करणे व सर्वसामान्य जनतेसाठी लागणऱ्या शासकीय महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी लाच स्वीकारणे अशा अनेक तक्रारी भ्रष्टाचार निर्मूलन खात्याच्या (एसीबी) अधिकऱ्यांकडे आल्या आहेत. त्यामुळे आज (ता. १६) भ्रष्टाचार निर्मूलन खात्याच्या पथकाने अथणी येथील तहसील कार्यालयावर धाड टाकून तक्रारींची शहानिशा करण्यासाठी तपास चालविला आहे. या धाडीमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
अथणी येथील तहसीलदार कार्यालयासह संबंधित अधिकाऱयांकडून अनेक तक्रारी दाखल झाल्यामुळे आज (ता. १६) उत्तर विभाग भ्रष्टाचार निर्मूलन खात्याचे पोलिस प्रमुख बी. एस. नेमगोंडा यांच्या मार्गदर्शनाखाली, भ्रष्टाचार निर्मूलन पथकाचे उपविभागीय पोलिस प्रमुख करुणाकर शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचार निर्मूलन पथकाचे फौजदार ए. एस. गुदगेपा यांच्यासह विजापूर, बागलकोट व गदग जिल्ह्यातील भ्रष्टाचार निर्मूलन पथकाचे उपविभागीय पोलिसप्रमुख व उपनिरीक्षकांनी मिळून ही धाड टाकली. यावेळी पथकातील सुमारे पन्नास अधिकऱ्यांनी अथणी येथील तहसीलदार कार्यालयात अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांची पडताळणी केली. त्याचबरोबर अथणीचे तहसीलदार दुंडप्पा कोमार व अन्य अधिकाऱ्यांची चौकशी चालविली आहे. अचानक पडलेल्या धाडीची चौकशी उद्यापर्यंत चालणार आहे, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

17 ते 20 एप्रिलदरम्यान अनगोळ येथे बैलगाडा पळवण्याची जंगी शर्यत

Spread the love  बेळगाव : मागील वर्षीप्रमाणे यंदाही बेळगाव शहरातील अनगोळ येथे भव्य बैलगाडा पळवण्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *