Tuesday , March 3 2026
Breaking News

जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्यावतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

Spread the love

बेळगाव : काल सोमवारपासून कर्नाटक राज्यात शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला आहे. या निमित्ताने जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनतर्फे पहिली ते पाचवीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पेन व वह्या वाटप कार्यक्रम सरकारी प्राथमिक शाळा भवानीनगर बेळगाव येथे आयोजित केला होता.

कार्यक्रम व्यासपीठावर जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष शिवकुमार हिरेमठ, सेक्रेटरी मुकुंद महागावकर, संचालक धीरेंद्र मरळीहळी तसेच शाळेचे एसडीएमसी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य मंडळी आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते.

शाळेत शिकणारा प्रत्येक विद्यार्थी हा देशाची राष्ट्रीय संपत्ती आहे. कारण त्याच्यावरच संपूर्ण राष्ट्राचे भवितव्य आणि प्रगती अवलंबून असते आणि म्हणूनच पुस्तके वाटप, वह्या वाटप करून प्रत्येक विद्यार्थ्याचा शिक्षणाप्रती उत्साह वाढवणे हे एक राष्ट्रीय कार्य आहे आणि ते जायंट्स ग्रुप या संस्थेच्या माध्यमातून होत आहे याचा अभिमान आम्हास आहे, असे प्रतिपादन जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष शिवकुमार हिरेमठ यांनी केले. याप्रसंगी सेक्रेटरी मुकुंद महागावकर व संचालक धीरेंद्र मरळीहळी यांनी सुद्धा शिक्षणाप्रती आपले विचार व्यक्त केले.
यावेळी बहुसंख्येने शाळेतील विद्यार्थी वर्ग, स्टाफ वर्ग, गुरुजन वर्ग उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जी. ए. गावकर यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *