
बेळगाव : वायव्य पदवीधर मतक्षेत्रातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री. हनमंत निराणी यांच्या प्रचारार्थ निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ कार्यालयमध्ये बैठक संपन्न झाली.
याप्रसंगी हनमंत निराणी म्हणाले, मागच्या वेळेला तुम्ही सर्वांनी प्रयत्न करून मोठ्या मताधिक्क्याने निवडून दिला आहात. पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून आणखी एक संधी दिली आहे. तेव्हा ग्रामीण भागातील सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की पदवीधरांच्या समस्या सोडविण्यासाठी मी कार्यतत्पर राहीन असे ते म्हणाले.
याप्रसंगी बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. तसेच बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांचेसुद्धा भाषण झाले.
व्यासपीठावर माजी आमदार मनोहर कडोलकर, जिल्हा उपाध्यक्ष युवराज जाधव, नगरसेविका विना विजापूरे, नगरसेवक हनुमंत कोंगाले आदी उपस्थित होते.
स्वागत पंकज घाडी यांनी केले. सूत्रसंचालन बसवराज दमनगी यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta