Saturday , October 19 2024
Breaking News

वीरशैव महासभेचे लिंगायत महासभेत रूपांतर करण्यास विरोध

Spread the love

बेळगाव : अखिल भारतीय वीरशैव महासभेचे नाव अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभा असे करण्यामुळे जनतेमध्ये गोंधळ निर्माण होत असून अखिल भारतीय जागतिक लिंगायत महासभा याला विरोध करत असल्याची प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष बसवराज रोट्टी यांनी व्यक्त केली.
बेळगावमधील विश्वगुरू कॉम्प्लेक्स मधील जागतिक लिंगायत महासभेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभा हि अखिल भारतीय लिंगायत महासभेत रूपांतरित करून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. 1940 मध्ये अ. भा. लिंगायत महासभा असे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. 1940 मध्ये तामिळनाडू येथे कुंभकोणमध्ये झालेल्या अधिवेशनात घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. वीरशैव हे नाव सुरुवातीपासून आहे. जनतेमध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी हा खटाटोप सुरु असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. बसवराज रोट्टी पुढे म्हणाले, लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळण्यासाठी आपले आंदोलन सुरु आहे. वीरशैव हा लिंगायत धर्मातील पंथ आहे. मात्र वीरशैव संघाकडून या आंदोलनाची दिशा बदलण्याचा प्रकार सुरु असल्याचे ते म्हणाले. वीरशैव महासभेचे पदाधिकारी, अध्यक्ष जनतेमध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी हे सर्व करत आहेत. परस्पर मतभेदामुळे आंदोलनाची दिशा बदली शकते असे बसवराज रोट्टी म्हणाले. पंचमसाली समाजाच्या आंदोलनासंदर्भात प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना बसवराज रोट्टी म्हणाले, आरक्षणासाठी होत असलेले आंदोलन हे वेगळे आहे. आमचे आंदोलन हे स्वतंत्र लिंगायत धर्माला मान्यता मिळविण्यासाठी असून जागतिक लिंगायत महासभा यासाठी आंदोलन करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *