Tuesday , March 3 2026
Breaking News

हुतात्मा स्मारक परिसराचे सपाटीकरण

Spread the love

बेळगाव : 1 जून 1986 रोजी कन्नड सक्ती आंदोलनात धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने दरवर्षी एक जून रोजी हुतात्मा दिन काळात हुतात्म्यांना अभिवादन केले जाते या पार्श्वभूमीवर येथील हुतात्मा स्मारक परिसराची स्वच्छता करत परिसराचे सपाटीकरण करण्यात आले.

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हुतात्मा स्मारक परिसरामध्ये 1 जून रोजी घटना आयोजन करण्यात येणार आहे याची स्मृती म्हणून सपाटीकरण करण्यात आले यावेळी मध्यवर्ती समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, तालुका समितीचे सरचिटणीस एम. जी. पाटील, युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक, माजी महापौर मालोजी अष्टेकर, उद्योजक आर. एम. चौगुले, संजय पाटील, मदन बामणे आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *