Tuesday , March 3 2026
Breaking News

शिक्षक पात्रता परीक्षा केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट

Spread the love

बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे मागवलेल्या पदवीधर आणि प्राथमिक शिक्षकांच्या १५ हजार जागांसाठी उद्यापासून २ दिवस पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांसह परीक्षा केंद्रांना भेटी देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली.
पदवीधर आणि प्राथमिक शिक्षकांच्या १५ हजार जागांसाठी सार्वजनिक शिक्षण खात्याने उद्या २१ आणि २२ मे रोजी पात्रता परीक्षा घेण्याची अधिसूचना गेल्या मार्चमध्ये जारी केली आहे. त्यानुसार उद्यापासून राज्यभरात पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. बेळगावातही २५ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी शिक्षण उपसंचालक बसवराज नलतवाड यांच्यासह परीक्षा केंद्रांना भेटी देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. परीक्षार्थी उमेदवारांसाठी सर्व मूलभूत सुविधा सज्ज ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *