बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोठ्या संख्येने मराठी भाषिक नगरसेवक- नगरसेविका निवडून आले पाहिजेत. बेळगाव महापालिकेवर मराठी भाषिकांचे वर्चस्व अबाधित राहिले पाहिजे. यासाठी तमाम मराठी भाषिकांनी एकत्र येऊन बेळगाव महापालिकेवर भगवा फडकवा, असे आवाहन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले आहे, अशी माहिती शिवसेनेचे बेळगाव सीमाभाग सहसंपर्कप्रमुख अरविंद नागनुरी यांनी दिली आहे.
बेळगावच्या शिवसेना पदाधिकार्यांनी काल सोमवारी मुंबई मुक्कामी खासदार संजय राऊत, शिवसेनेचे सचिव आणि खास. अनिल देसाई तसेच महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली.
या भेटी दरम्यान बेळगावच्या शिवसैनिकांनी लवकरच होणार्या बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात संजय राऊत आणि अनिल देसाई यांना माहिती दिली.
यावेळी बोलताना संजय राऊत यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती तसेच बेळगावातील तमाम मराठी संघ संस्थांनी एकत्र येऊन महापालिकेवर सत्ता प्रस्थापित करणे महत्त्वाचे आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत तमाम मराठी भाषिकांनी एकदिलाने काम करणे आवश्यक आहे. या कामात शिवसेनेनेही पुढाकार घ्यावा, असे आवाहन खासदार संजय राऊत आणि मंत्री अनिल देसाई यांनी केले आहे अशी माहिती अरविंद नागनुरी यांनी दिली आहे.
या भेटीदरम्यान शिवसेनेचे बेळगाव उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक दिलीप बैलुरकर, तालुकाप्रमुख सचिन गोरले, चंद्रकांत कोंडुस्कर, प्रकाश राऊत, विश्वनाथ येळ्ळूरकर, पिराजी शिंदे आदी उपस्थित होते.
Check Also
स्वामी विवेकानंद स्मारकाच्या भेटीचे जनतेला जाहीर निमंत्रण
Spread the love बेळगाव : स्वामी विवेकानंद यांनी 16 ऑक्टोबर 1892 पासून सलग तीन दिवस …