मेंगलोर : ब्लॅक फंगस आजार झाल्यास आम्हाला खूप मोठी किंमत चुकवावी लागेल. ती खर्च करण्याची आमची तयारी नाही. त्यामुळे आम्ही दोघंही आत्महत्या करत आहोत, असा ऑडिओ मॅसेज पोलिस आयुक्तांना पाठवत एका दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना कर्नाटकातील मंगलोरच्या बँकम्पाद्यो येथे घडली असून 40 वर्षीय रमेश आणि 35 वर्षीय गुना सुवर्णी, असा या दाम्पत्याचं नाव आहे. आपल्या सुसाईड नोटमध्ये पतीने म्हंटलंय की, माझ्या पत्नीला मधुमेहाचा त्रास आहे. मधुमेह असणार्यांना कोरोना संक्रमण झाल्यानंतर ब्लॅक फंगस आजार होऊ शकतो, अशी माहिती माध्यमांतून सातत्याने मिळते आहे. त्यामुळे आम्हा दोघांच्या मनात भीती आहे.
असा आशयाचे ऑडिओ मॅसेज जेव्हा पोलिस आयुक्त एन. शशिकुमार यांना आला, तेव्हा त्यांनी त्वरीत दोघांशी संपर्क साधत ‘कुठलंही टोकाचं पाऊल उचलू नका’, अशी विनवणी केली. मात्र, त्यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्या दाम्पत्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
आमच्या मनात ब्लॅक फंगसविषयी मोठी दहशत आहे. माझी पत्नी गुना सवर्णी हिला शारीरिक व्याधी असल्याने ती बाळाला जन्म देऊ शकत नाही. त्यामुळे ती लोकांपासून दूर जात होती. तर पत्नी सांगते की, मी आणि माझ्या पतीने निश्चय केला आहे की, आमच्यावर शरण पंपवेल आणि सत्यजीत सुरथकल यांच्याकडून हिंदू प्रथेप्रमाणे अंत्यसंस्कार करावेत. त्यासाठी आम्ही 1 लाख रुपये ठेवलेले आहेत, असंही या दाम्पत्याने ऑडिओ मॅसेजमध्ये सांगितलं आहे.
आमच्या घरातील साहित्य गरीबांना वाटून टाका. आमच्या आई-वडिलांचा त्याचा काही उपयोग नाही. तसेच आम्ही आमच्या घरामालकाचीही माफी मागतो, असंही त्यांनी सूसाईल नोटमध्ये म्हंटलेलं आहे. आरोग्यमंत्री सुधाकर असं म्हणाले की, त्या दोघांची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आलेली होती. त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली आहे.
