बेळगाव : पश्चिम विभाग शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश हायस्कूल बिजगर्णीचे (ता. बेळगाव) मुख्याध्यापक वाय. एच. पाटील व लिपिक एस. एन. जाधव यांचा शुक्रवारी (ता.२७) निवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. हायस्कूलच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार चन्नराज हट्टीहोळी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांना निरोप देण्यात आला.
व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन गुंडू सोनू भाष्कळ, एपीएमसीचे माजी चेअरमन युवराज कदम, ग्राम पंचायत अध्यक्ष मनोहर बेळगावकर, बेळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अद्यक्ष एस. एस. मठद, वाय. पी. नाईक, एस. आर. मोरे, ऍड. नामदेव मोरे, एस. एम. जाधव, पी. पी. बेळगावकर, बंडू भाष्कळ, रिता बेळगावकर, ओमानी मोरे आदी होते.
यावेळी बोलताना आमदार हेब्बाळकर यांनी, कोणत्याही शाळेल मुख्याध्यापक व लिपिक खुप महत्वाची भूमिका पार पाडत असतात. त्यांची जरी निवृत्ती होत असली तरी ते गप्प बसणार नाहीत. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ते शाळेशी जोडले जातील.
प्रमुख वक्ते नाईक यांनीही विचार मांडले.
यावेळी सत्कारमूर्तींनी शाळेला मायक्रोस्कोप भेटीदाखल दिला.
तसेच योगेश अर्जुन निलजकर यांनी शाळेला 5 संगणक दिले.
यावेळी विद्यार्थ्यांना अर्जुन निलजकर यांनी गणवेश तर वह्या एस. एम. जाधव यांनी दिल्या. पाहुण्यांचे स्वागत तालुका पंचायत माजी उपाद्यक्ष यल्लाप्पा बेळगावकर यांनी केले. प्रास्ताविक आर. पी. सरवनकर यांनी केले. सूत्रसंचालन के. आर. भाष्कळ यांनी केले. आभार रमेश कांबळे यांनी मानले.