बेळगांव : बेळगांव महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 50 मधून शिवानी उमेश पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहीन तसेच आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असेन असे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना सांगितले. प्रभागातील मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव तत्पर असेन.
