Sunday , July 21 2024
Breaking News

जायंट्सच्या बेळगाव प्राईड सहेलीचे उद्घाटन उत्साहात

Spread the love

बेळगाव : जायंट्स वेल्फेअर फौंडेशन आणि जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवार यांच्यातर्फे आयोजित ‘जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव प्राईड सहेली’ या क्लबचा उद्घाटन समारंभ आणि आरती शहा यांच्या अध्यक्षतेखालील क्लबच्या कार्यकारिणीचा अधिकारग्रहण समारंभ नुकताच उत्साहात पार पडला

शहरातील सुभाष मार्केट येथे हिंदू सोशल क्लब येथे काल बुधवारी सायंकाळी जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव प्राईड सहेलीचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जी डब्ल्यू एफ मुंबईचे केंद्रीय समितीचे सदस्य दिनकर के. आमीन, फेडरेशन अध्यक्ष श्रीमती तारादेवी वाली, भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत, जायंट्स फेडरेशनचे माजी अध्यक्ष राजू माळवदे, आनंद जांगळे आणि लगमाण्णा दोडमनी यांच्यासह इन्स्टॉलेशन ऑफिसर म्हणून अनंत लाड उपस्थित होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर प्रियांका जोशी, निरुपमा शहा, रिया सिंग व मदालसा चौगुले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर प्रमुख पाहुणे दिनकर आमीन यांच्या हस्ते जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव प्राइड सहेलीचे उद्घाटन करण्यात आले.

आपल्या उद्घाटनपर भाषणात दिनकर अमीन यांनी उपस्थित नव्या सदस्यांना जायंट्स ग्रुपच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली. तसेच उद्घाटन झालेल्या नूतन क्लबला शुभेच्छा व्यक्त करताना त्यांच्याकडून उत्तम कार्याची आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविण्याची अपेक्षा व्यक्त केली. डॉ. सोनाली सरनोबत यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात क्लबच्या उद्घाटनाप्रसंगीचा सर्वांमधील उत्साह शेवटपर्यंत टिकणे आवश्यक आहे. सामाजिक कार्य करताना ते निस्वार्थीपणे करा असे सांगून शहरात कार्य करत असतानाच आसपासच्या खेडेगावांमध्ये देखील जाऊन समाजसेवा करण्याचा सल्ला दिला. श्रीमती तारादेवी वाली यांनी देखील यावेळी समयोचित विचार व्यक्त केले.

उद्घाटन समारंभानंतर जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव प्राइड सहेलीच्या कार्यकारिणीचा अधिकारग्रहण सोहळा पार पडला. यावेळी कार्यकारणीच्या सदस्यांना दिनकर आमीन यांनी, संचालकांना अनंत लाड यांनी तर अध्यक्षा आरती शहा यांना श्रीमती वाली यांनी अधिकारपदाची शपथ देवविली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनाली शहा यांनी केले. तर शेवटी जिग्ना शहा यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमास जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवारचे पदाधिकारी, सदस्य जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव प्राइड सहलीचे सदस्य, निमंत्रित आणि हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सौंदत्तीजवळ दुचाकींचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

Spread the love  उगारगोळ : हिरेकुंबीजवळ शुक्रवारी सायंकाळी दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *