निपाणी : केएलई संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि रोटरी क्लब, निपाणी यांच्या संयुक्त विद्यमानाने लिव्हरतज्ञ, गॅस्ट्रो एन्ट्रोलॉजिस्ट डॉ. संतोष हजारे यांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर रोटरी हॉल निपाणी येथे होणार आहे. शनिवारी (ता. 4) सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सदर शिबिर होणार आहे. यावेळी पोटदुखी, लिव्हरला सुज येणे, पोट फुगणे, गॅस, असिडिटी, अपचन, बद्धकोष्टता, हिपॅटायटिस (काविळ), लठ्ठपणा, पोट साफ न होणे, लहान आणि मोठ्या आतड्याचे अल्सर, लिव्हर किंवा पित्ताशयाचे आजार याकरिता मोफत तपासणी करून सल्ला दिला जाणार आहे. तरी गरजुंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केएलई संस्थेचे संचालक अमर बागेवाडी, रोटरी क्लब निपाणीचे अध्यक्ष सोमनाथ परमणे, हेल्थ केअर सेंटरचे अध्यक्ष सचिन देशमाने व सदस्यांनी केले आहे.
