निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र राज्य युवा पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकार, डॉक्टर, उद्योजक, समाजिक कार्य करणार्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन नष्टे लॉन कोल्हापूर येथे गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात बेळगाव गोमटेश विद्यापीठ संचलित निपाणी येथील गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूलचे उपाध्यक्ष प्रशांत ऊर्फ उदय पाटील यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
क्षेत्रातील उदय पाटील यांनी निपाणीतील ’गोमटेश’च्या माध्यमातून शैक्षणिकक्षेत्रात भरीव कार्य केले आहे. कोरोनाकाळात दिव्यांगांचे लसीकरण या उपक्रमातही त्यांचे योगदान लाभले आहे. कणेरी मठाच्या विद्याचेतना उपक्रमात ते सध्या सक्रिय आहेत. आमदार जयश्री जाधव, अभिनेत्री पूजा जयस्वाल, नगरसेवक दिलीप पोवार, अशोक भंडारे, राहुल चव्हाण, शिवराज नाईकवाडे, अॅड. संदीप पवार, उदय बेलवलकर, युव पत्रकार संघाचे शिवाजी शिंगे, जावेद देवडी, रतन हुलस्वार, बाबुराव वळवडे, अजय शिंगे, रत्नदीप चव्हाण यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
