बेळगाव : बेळगुंदी ग्रामस्थांच्यावतीने कन्नड सक्ती आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी सोमवार दि. 6 जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व समितीप्रेमी मराठी भाषिकानी उपस्थित रहावे, असे आवाहन तालुका समिती अध्यक्ष निंगोजी हुद्दार, कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, युवा आघाडी अध्यक्ष संतोष मंडलिक, ऍड. एम. जी. पाटील, चिटणीस म्हात्रू झंगरुचे, माजी महापौर शिवाजी सुंठकर व मनोज पावशे यांनी केले आहे.
