Saturday , July 20 2024
Breaking News

मणतुर्गा येथील म. ए. समितीची निर्धार सभा अपरिहार्य कारणामुळे रद्द

Spread the love

खानापूर : शुक्रवार दिनांक 3 रोजी मणतुर्गा (ता.खानापूर) येथे आयोजित करण्यात आलेली खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची दुसरी निर्धार सभा काही अपरिहार्य कारणामुळे रद्द करण्यात आली.
शुक्रवार दिनांक 3 रोजी सभेच्या काही वेळापूर्वी ज्येष्ठ समिती कार्यकर्त्याच्या वाहनाचा अपघात झाल्याने ही सभा समिती नेत्यांनी सर्वानुमते रद्द केली. पुढील निर्णय सर्वांच्या विचार विनिमयातून घेण्यात येईल. कार्यकर्त्यांनी संभ्रमात न राहाता चळवळीचे कार्य सुरू ठेवावे, असे माजी आ. दिगंबर पाटील आणि ज्येष्ठ नेते देवाप्पा गुरव यांनी कळविले आहे.

About Belgaum Varta

Check Also

जांबोटी – चोर्ला मार्गावर वाहतूक कोंडी; वाहतूक मार्गात बदल

Spread the love  खानापूर : पश्चिम घाटात सतत पडणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर बेळगावातही पावसाचा जोर कायम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *