Monday , September 21 2026
Breaking News

अतिरिक्त पोलीस महासंचालकांना पोलीस दलाकडून मानवंदना

Spread the love

बेळगाव (प्रतिनिधी) : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने पोलीस दलाने प्रभावी उपाययोजना राबविल्या आहेत. त्याचप्रमाणे यामध्ये समाजाची शांतता अबाधित राखण्यासाठी नागरिक आणि माध्यमे यांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे विचार कर्नाटक राज्य पोलीस दलाचे कायदा सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोक कुमार यांनी व्यक्त केले.
एडीजीपी आलोक कुमार यांना पोलिस दलाच्या वतीने शनिवारी झालेल्या एका कार्यक्रमात शानदार मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलिस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, पोलिस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, डीसीपी रवींद्र गडादी, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निम्बर्गी यांच्यासह विविध विभागांचे पोलीस प्रमुख उपस्थित होते. यावेळी पोलिस दलाच्या पथकाने शानदार पद संचलन करून मानवंदना दिली त्यानंतर मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या पूर्वी आलोककुमार यांनी शुक्रवारी रात्री मार्केट आणि खडेबाजार पोलीस स्टेशनला भेट दिली. तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कर्तव्याची आणि आरोग्याची माहिती दिली. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या आणि स्थानिक पोलीस अधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *