Sunday , April 20 2025
Breaking News

छावा ग्रुपने पटकाविला ’नरेंद्र’ चषक

Spread the love

रायझिंग स्टार उपविजेता : शिंदे परिवारातर्फे आयोजन
निपाणी (विनायक पाटील) : येथील निपाणी फुटबॉल अकॅडमीचे सदस्य दिवंगत नितीन शिंदे यांच्या स्मरणार्थ मंगळवारपासून (ता.24) नरेंद्र चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शिंदे परिवाराच्या सहकार्याने निपाणी फुटबॉल अ‍ॅकडमीतर्फे समर्थ मंडळ व्यायाम शाळेच्या मैदानावर आयोजित स्पर्धेमध्ये येथील छावा ग्रुपने विजेतेपद पटकावून रोख दहा हजाराचे बक्षीस आणि चषक मिळविले. तर रायझिंग स्टार क्लब फुटबॉल संघाने उपविजेतेपद पटकावले सात हजाराचे बक्षीस व चषक पटकावले. आठ दिवस चाललेल्या या स्पर्धा पाहण्यासाठी निपाणी व परिसरातील फुटबॉल प्रेमींनी गर्दी केली होती. विजेत्यांना व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी महिला क्रिकेट स्पर्धेच्या सदस्य अनुजा पाटील, धनश्री शिंदे, सुनीता शिंदे, वैशाली शिंदे, शोभा साळोखे, गजानन शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उत्कृष्ट गोलकीपर म्हणून साखरवाडी फुटबॉल क्लबच्या श्रेयस कराळे, मॅन ऑफ द मॅच म्हणून छावा ग्रुपच्या प्रथमेश आजरेकर, बेस्ट टूर्नामेंट म्हणून आरएसवायसीच्या अभिषेक अवडणकर, बेस्ट फॉर्म फॉरवर्ड म्हणून आरएसवायसीच्या करण माने, बेस्ट गोलकीपर म्हणून छावा ग्रुपच्या ओम कदम, बेस्ट मेड फिल्डर म्हणून आरएसवायसीच्या अमन, मॅन ऑफ जी टूर्नामेंट म्हणून धनंजय माने व विश्वजीत माने, बेस्ट डिफेंडर म्हणून छावा संघाच्या जॉन मधाळे यांना गौरवण्यात आले.
यावेळी ओंकार शिंदे व मान्यवरांनी यांनी मनोगत व्यक्त करून दरवर्षी शिंदे परिवारातर्फे या स्पर्धेसह सामाजिक, शैक्षणिक क्रीडा क्षेत्रातील विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास धनंजय मानवी, धनश्री शिंदे, सुनीता शिंदे, राहुल शिंदे, प्रतीक शहा, तुषार शिंदे, सोमनाथ शिंदे, अरुण वैद्य, वीरेंद्र येडूरे, आनंद परीट, गजेंद्र तारळे, अमर बिल्ले, संतोष पोळ, निवास पाटील, सुरेंद्र कागे, इंद्रजीत बगाडे, मधुकर खवरे, नितीन साळुंखे, चंद्रकांत दळवी, राहुल शिंदे, पप्पू शिंदे, आकाश खवरे, विजय साळुंखे, रणजीत माने, चंद्रकांत दळवी, जॉन मधाळे, प्रशांत आजरेकर, गणेश घोडके, अतुल चावरेकर, प्रथमेश जासूद, नंदकुमार कांबळे, यांच्यासह निपाणी फुटबॉल अकॅडमीचे सदस्य उपस्थित होते. सचिन फुटाणकर यांनी सूत्रसंचालन केले. गणेश घोडके यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

चांद शिरदवाड येथे १४ पासून पंचकल्याण महोत्सवाचे आयोजन

Spread the love  डॉ. अविनाश पाटील; ७ दिवसात विविध कार्यक्रम निपाणी (वार्ता) : चांद शिरदवाड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *