Thursday , June 4 2026
Breaking News

श्री शनेश्वर जयंती महाप्रसादाचे पोलीस आयुक्तांना निमंत्रण

Spread the love

बेळगाव : शहरातील श्री शनेश्वर एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर सोसायटीतर्फे श्री शनेश्वर जयंती उत्सवानिमित्त आयोजित महाप्रसाद कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण आज पोलीस आयुक्तांना देण्यात आले.
श्री शनेश्वर एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष संजय शहा यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज शनिवारी पोलिस आयुक्तालयात जाऊन
पोलीस आयुक्त डाॅ. एम. बी. बोरलिंगय्या यांची भेट घेतली. तसेच त्यांना श्री शनेश्वर जयंती उत्सवाची माहिती देऊन त्यानिमित्त उद्या रविवार दि. 5 जून रोजी आयोजित महाप्रसाद कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहावे असे निमंत्रण दिले. याप्रसंगी सोसायटीचे सेक्रेटरी श्रीकांत देसाई, माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील, माजी महापौर सतीश गौरगोंडा, विकास कलघटगी, अमर चौगुले आदी उपस्थित होते.
श्री शनेश्वर मंदिर, कपलेश्वर रोड येथे गेल्या 30 मे रोजी श्री शनेश्वर जयंती उत्सव भक्तीभावाने साजरा करण्यात आला. त्यानिमित्त उद्या रविवारी दुपारी 12:30 ते 3:30 या कालावधीत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वी श्री शनेश्वर जयंती निमित्त गेल्या 30 मे रोजी चौधरी पॅलेस पाटील गल्ली येथे रक्तदान शिबिराचा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला होता.

About Belgaum Varta

Check Also

राष्ट्रीय मिलिटरी स्कूलमध्ये सीबीआयची चौकशी; आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांची पडताळणी

Spread the love  बेळगाव : देशातील सहा राष्ट्रीय मिलिटरी स्कूलपैकी एक असलेल्या राष्ट्रीय मिलिटरी स्कूल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *