बेळगाव : भरतेश कॉलेजचा विद्यार्थी तुषार भेकणे हा भारतातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून समजणारी खेलो इंडियासाठी निवड झाली आहे. सदर स्पर्धा पंचकुला हरियाणा येथील तारू देवीलाल स्टेडियम या ठिकाणी पार पडत आहे.
या स्पर्धेत मन्नूर गावचा सुपुत्र आणि भरतेश महाविद्यालयाचा विद्यार्थी तुषार वसंत भेकणे याची पंधराशे मीटर धावणे या प्रकारात कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
ही स्पर्धा पाच जून ते दहा जून पर्यंत होणार आहे. या कालावधीत संपन्न होणाऱ्या या स्पर्धेत हा बेळगावचा धावपटू सहभाग घेत आहे. तुषार भेकणे सेंट पॉल स्कूलमध्ये शिकत असताना अनेक राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर क्रमांक मिळवले आहेत.
तो सध्या तो स्टॅंडर्ड ट्रॅक्ट क्लब मध्ये सराव करत असून त्याला भरतेश कॉलेजचे प्रिन्सिपल शारीरिक शिक्षण प्रमुख तसेच कॉलेजचे ॲथलेटिक्स कोच प्रदीप जुवेकर व शिरीष साबरेकर व यांचे वडील वसंत यल्लाप्पा भेकणे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta