बेळगाव : हिंदवी स्वराज्य संस्थापक, अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिनी 6 जून रोजी छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यान शहापूर येथील मूर्तीस कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशन राज्य उपाध्यक्ष व माजी आमदार श्री. मनोहर कडोलकर, मराठा बेळगांव जिल्हा अध्यक्ष कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशन प्रमुख श्री. वैभव विलास कदम, नवनिर्वाचित पदाधिकारी श्री. सचिन कोले, श्री. बसू लाड, श्री. राहुल भातकांडे, श्री. राजू सांबरेकर, श्री. गणपत पाटील व श्री. वामन कदम यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित शिवभक्तांनी छत्रपती श्री शिवराय यांची आरती व स्मरण करत राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या सन्मानार्थ गगनभेदी घोषणा दिल्या.
यावेळी कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते शिवप्रेमी उपस्थित होते.
