बेळगाव : गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन मिळावे म्हणून सरकारी मराठी मुलांची शाळा क्र. 27 शिवाजीनगर येथील मुलांना संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्य देण्यात आले. या शाळेतील मुलांचे पालक हा कामगार वर्ग असून हलाखीच्या परिस्थितीतही ते आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी झटत आहेत. त्यांना प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी एक स्कुल बॅग, अर्धा डझन वह्या, पेन, पेन्सिल, रबर, शापनर, पट्टी असे शालोपयोगी साहित्य देण्यात आले.
यावेळी फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर, कॅन्टोनमेंट मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत बिर्जे, अमर एच, राजू भोसले, अवधूत तुडयेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका के. पी. मेलगे, सौ. एस. आर. मुतगेकर, इतर शिक्षक व शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.
या मदतीबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका मेलगे मॅडम यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta