बेंगलोर : देशातील विविध राज्यांसह कर्नाटक राज्याशेजारील केरळ आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. याच वेळी कर्नाटक राज्यात सार्वजनिक गणेशोत्सव संदर्भात जारी करण्यात आलेले निर्बंध शिथील करण्यात यावेत, अशी मागणी सत्ताधारी पक्षातील भाजप आमदारच करू लागले आहेत.
कर्नाटक राज्यातही बेंगलोरसह अन्य काही शहरात कोरोना रुग्ण संख्येत किंचीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशा वेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना सार्वजनिक गणेशोत्सव संदर्भातील निर्णय तारेवरची कसरत बनला आहे.
या महिन्यातील सार्वजनिक गणेशोत्सवा बरोबरच पुढील महिन्यात महिन्यातील जागतिक ख्यातीच्या म्हैसूर दसरा उत्सव बाबतही बसवराज बोम्मई यांना लवकरच निर्णय घ्यावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर आज रविवारी सायंकाळी या वर्षीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या नियमावली संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.
Check Also
जीवन संघर्ष फाउंडेशनतर्फे 25 रोजी राष्ट्रीय कला, संस्कृती संमेलन
Spread the love बेळगाव : 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जीवन संघर्ष फाउंडेशन बेळगाव व एशियन …