येळ्ळूर : चोरट्यांनी घरादारांसोबत आता मंदिरेही लक्ष बनविली आहेत. चांगळेश्वरी मंदिर येळ्ळूर येथे चोरीचा प्रकार उघडकीस आला असून एकच खळबळ माजली आहे.
चोराट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे फिरवून दरवाजाचे लॉक तोडून देवीचे दागीने व सीसीटीव्ही सिस्टीम व इतर चोरून नेले.
सोन्याचे दागीने 80,000/- हजाराचे. चांदीचे दागीने 4,000/- हजाराचे, सिस्टम 30,000/- असे एकूण 114,000/- साहित्य चोरण्यात आले आहेत.
रात्रीच्या वेळी चोरट्यांनी हात साफ केला असून सकाळी हा प्रकार लक्षात आला आहे. याबद्दल पोलिसांना कळविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
मागील काही वर्षांपूर्वी देखील चोरीचा प्रकार या मंदिरात घडला होता ग्रामीण भागात चोऱ्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवावा अशी मागणी होत आहे
चांगळेश्वरी मंदिर प्रसिद्ध आणि जागृत आहे. या मंदिरात हा चोरीचा प्रकार घडल्याने येळ्ळूर ग्रामस्थांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Check Also
सुवर्ण महोत्सवी “ज्वाला” दिवाळी अंकाचे दिमाखात प्रकाशन
Spread the love बेळगाव : प्रतिकूल परिस्थितीत सुरू झालेली “ज्वाला”ची वाटचाल महोत्सवी वर्षापर्यंत पोचली आहे. …