बेळगाव : भाजप कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव आणि विमल फाउंडेशन या सेवाभावी संस्थेचे चेअरमन किरण जाधव यांनी यावर्षी ” गणेश महोत्सव- 2021″ अंतर्गत घरगुती आकर्षक गणेश मूर्ती आणि सजावट स्पर्धेचे आयोजन केले आहे.
बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण आणि बेळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी ही स्पर्धा घेतली जाणार आहे. स्पर्धा प्रवेश निशुल्क आहे.
तिन्ही मतदारसंघासाठी पहिल्या चार विजेत्या क्रमांकांना स्वतंत्र पारितोषिके दिली जाणार आहेत. तिन्ही विभागातील पहिल्या चार विजेत्यांना अनुक्रमे 5 हजार रुपये रोख, 3 हजार 500 रुपये रोख, 2 हजार रुपये रोख आणि 750 रुपये रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेत भाग घेवू इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी घरातील गणेशमूर्ती व सजावट केलेले एक छायाचित्र तसेच गणेश मूर्ती आणि सजावटीसोबत स्वतःची एक सेल्फी काढून स्पर्धा आयोजन समितीच्या संबंधित व्हाट्सअप क्रमांकावर पाठवायचे आहेत.
स्पर्धकांनी व्हाट्सअप क्रमांकावर पाठवलेल्या छायाचित्रांमधून निवड कमिटीकडून निवडण्यात आलेल्या उत्कृष्ट गणेशमूर्ती आणि सजावट केलेल्या स्पर्धकांच्या घरी स्पर्धा आयोजन समितीचे सदस्य भेट देऊन पाहणी करतील. त्यानंतर उत्कृष्ट मूर्ती आणि सजावट क्रमांक काढण्यात येणार आहेत.
स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी 12 सप्टेंबरपर्यंत व्हाट्सअप क्रमांक 8105638887 यावर गणेशमूर्ती आणि सजावट याचे एक छायाचित्र आणि गणेश आणि सजावटीसोबत स्पर्धकाने काढलेली एक सेल्फी पाठवावयाची आहे.
Check Also
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक
Spread the love बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने रविवार दिनांक 13 ऑक्टोबर 2024 …