बेळगाव : शिवसेनेच्या 56 व्या वर्धापन दिनानिमित्त युवा सेना सीमाभाग बेळगांवची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी युवासैनिक व कार्यकर्त्यांनी छ. शिवाजी महाराज व शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना वंदन केले.
नाथ पै चौक, शहापूर येथील नेताजी भवन येथे शिवसेना युवा सेना बेळगावची बैठक काल रविवारी पार पडली. सदर बैठकीस स्थानिक युवासैनिकांसह खानापूर, भागातूनही कार्यकर्ते, युवासैनिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
प्रारंभी शिवरायांसह शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व शिवसैनिक व युवासैनिकांनी बेळगावात मराठीचे महत्व व मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याचा निश्चय केला. त्या अनुषंगाने मराठीतून माहिती फलक कागदपत्रे मिळावी यासाठी येत्या 27 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चात जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन युवा सेना सीमाभाग बेळगावतर्फे करण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta