
बेळगाव : शहापूर येथील विश्व भारत सेवा समितीच्या पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयातून बारावीच्या परीक्षेत कु. श्वेता शिवाजी चौगुले वाणिज्य विभागात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले असून तिला 548 (91%) गुण मिळाले आहेत. तर सानिका परशराम बाळेकुंद्री 532 (89%) हिने द्वितीय आणि नयन भैरव बाळेकुंद्री 479 (80%) गुण प्राप्त करुन तृतीय क्रमांक मिळविला आहे.
याबरोबरच कला विभागात प्रेरणा जीवदत्त जुनीन प्रथम, ओमकार बळीराम पाटील द्वितीय, संजना मारुती लखमन्नावर तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे खास अभिनंदन करण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta