Tuesday , March 3 2026
Breaking News

जायन्ट्स प्राईड सहेली व मारवाडी युवा मंच यांच्यावतीने योग दिन साजरा

Spread the love

बेळगाव : जायन्ट्स प्राईड सहेली व मारवाडी युवा मंच आयोजित एक आठवड्याचे योगा शिबिर आज गजानन महाराज ध्यान मंदिरमध्ये संपन्न झाले

या सात दिवसात योग प्रशिक्षक श्री. नईम शेख यांनी अनेक प्रकारचे योग शिकवले. सात दिवस रोज अग्निहोत्र होत होते. साऊंड हीलींगमुळे ताणतणाव कसे कमी होतात याचे प्रात्यक्षिक दाखवले.
शिबीर संपल्यानंतर ही योगा वर्ग तसेच अनेक उपक्रम चालू राहणार आहेत. ज्यांना रेकी अग्निहोत्र शिकायचे आहे. त्यांच्यासाठी वेगळे वर्ग घेण्यात येणार आहेत, अशी माहिती सहेलीच्या अध्यक्षा आरती शहा यांनी दिली.
हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी महत्त्वाचे योगदान मारवाडी युवा मंचच्या अध्यक्ष मधुसूदन भट्टड, कमलेश राजपुरोहित, जितेंद्र बोकाडिया, मनीषा उपाध्याय, ऐश्वर्या सारडा, निधी अगरवाल, तसेच सहेलीच्या रूपा मंगावती, नीता बीडीगर, स्नेहल शहा, उषा मेहता यांनी केले.
या कार्यक्रमाची संकल्पना व पूर्ण करण्याची कामगिरी श्री. गोपाल उपाध्याय व पवन राजपुरोहित यांनी केली.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *