बेळगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व वाचनालयतर्फे गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत मौलिक विचार व्यक्त केले. ते म्हणाले, विद्यार्थी हाच देशाचा खरा शिल्पकार आहे. गाव, देश, गुरु, आईवडील यांना कधीच विसरू नका. सातत्याने अभ्यास करा. पुस्तके वाचनातून आपणास विविध अनुभव येतात. तेच खरे भविष्यात उपयुक्त ठरतात. लेखन, वाचन, चिंतन केल्याने ज्ञानव्रदधी वाढते. ग्रंथ हेच आपले खरे मित्र आहेत. तेच चांगले संस्कार घडवितात असे मौलिक विचार त्यांनी व्यक्त केले.
पहिली ते नववी वर्गात शिकणारे विद्यार्थ्यांना वह्या, कंपास पेनसेट, पेन्सिल, कलरपेटी, अंकलपी देऊन होतकरु व गरजू विद्यार्थ्यांना वाटप मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी पंचवीस विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला.
याप्रसंगी मनोहर मोरे, सूरज कणबरकर, भाऊराव बाचीकर, पृथ्वी जाधव, एम. पी. मोरे, रघुनाथ बाचीकर, दयानंद यळूरकर, रवळनाथ दे. बाचीकर, पांडुरंग सा. मोरे, युवराज प. नाईक, कांचन सावंत, प्रसाद रा. जाधव, नारायण मोरे, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जोतिबा बा. मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta