Monday , September 21 2026
Breaking News

उमेश कत्तींची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा

Spread the love

सिद्धरामय्या, स्वतंत्र उत्तर कर्नाटकाच्या मागणीला विरोध
बंगळूर : विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी गुरुवारी राज्याचे आहार व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री उमेश कत्ती यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली. कत्ती यांनी राज्याचे विभाजन करण्याचे विधान जारी केले आहे, हे आक्षेपार्ह असल्याचे ते म्हणाले.
या संदर्भात त्यांनी ट्विट करून म्हटले आहे, की राज्याचे विभाजन करण्याची चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पातळीवर झाल्याचे धक्कादायक सत्य मंत्री उमेश कत्ती यांनी उघड केले आहे. माजी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री बोम्मई यांना वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची विनंती केली आहे.
मंत्री उमेश कत्ती हे जबाबदारीच्या पदावर आहेत. पक्षीय किंवा सरकारी पातळीवर अशी चर्चा झाल्याशिवाय राज्य तोडण्याच्या योजनेबद्दल ते बोलू शकत नाहीत. ते खोटे बोलत असतील तर अशा बेजबाबदार विधानाबद्दल त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले पाहिजे, असे ते म्हणाले.
अथक संघर्षामुळे स्थापन झालेल्या कर्नाटकचे तुकडे पाडण्याची योजना आखणे म्हणजे राज्यातील जनता व राज्याशी द्रोह करण्यासारखे आहे, असे ते म्हणाले.
वेगळे राज्य स्थापनेवर मंत्री उमेश कत्ती यांचे वक्तव्य ही पहिलीच वेळ नाही. बेळगाव या भाषासंवेदनशील भागात अशा प्रक्षोभक विधानांचा फटका बसला तर राज्यातील भाजप सरकारने त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे सिद्धरामय्या म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *