बेळगाव : मागील दोन वर्षांपासून वसाहत योजनेच्या लाभार्थ्यांना घरी मिळालेली नाहीत. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजने मधील घरे गोरगरिबांना उपलब्ध करून द्यावीत, अशा मागणीसाठी विविध संघटनांच्या सहकार्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की अनेक वेळा स्वतःचे घरकुल मिळेल या आशेवर नागरिकांनी सरकारदरबारी अर्ज केले आहेत. मात्र त्यांच्या अर्जाची दखल घेण्यात आलेली नाही त्यांना घरापासून वंचित राहून बेघर होण्याची वेळ आली आहे कोरोनाच्या कालावधीपासून संकटात सापडलेल्या गोरगरिबांसाठी विविध योजना गतिमान करण्याची गरज आहे. मात्र त्याकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे याची दखल घेऊन सरकारने सदर योजना त्वरीत मार्गी लावावी, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. हनुमंत तिकोळी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta