बेळगाव : शहर देवस्थान कमिटीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आज श्री लक्ष्मी देवस्थान लक्ष्मी टेक येथे पावसासाठी साकडे घालण्यात आले. यावेळी सर्व देवी-देवतांचे पूजन करून पावसासाठी गाऱ्हाणे घालण्यात आला.
त्यानंतर प्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव आणि अनेक गल्लीतील पंच मंडळी उपस्थित होते. याप्रसंगी गणपत पाटील, परशराम माळी, विजय तमुचे, अशोक कंग्राळकर, विठ्ठल पाटील, महेश मुतगेकर, गजानन चौगुले, नारायण चौगुले, सागर मुतगेकर, चंदू बाडीवाले, प्रा. आनंद आपटेकर, लक्ष्मण किल्लेकर बाळगोपाळ आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta