बेळगाव : बसवन कुडची मराठी शाळा इमारतीचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पाडले. बसवन कुडची येथे सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेच्या नव्याने बांधलेल्या इमारतीचा उद्घाटन समारंभ शनिवार दि. २५ रोजी सकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. यानिमित्त सकाळी ९ वाजता एसडीएमसी अध्यक्ष रामा दळवी, व सौ. छाया रामा दळवी यांच्या हस्ते श्री सत्यनारायण पूजा करण्यात आली.
माजी नगरसेवक बसवंत हलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. उद्घाटक म्हणून आमदार अनिल बेनके उपस्थित होते. सकाळी नवीन इमारतीचे उद्घाटन झाले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार मंगला अंगडी होत्या. अतिथी म्हणून शहर शिक्षणाधिकारी वाय. जे. बजंत्री, नगरसेवक बसवराज मोदगेकर, गव्हमेंट कॉन्ट्रॅक्टर विद्याधर शिंगेसह मान्यवर उपस्थित होते.
दुपारी एकनंतर शंकर दिवटे यांच्यातर्फे स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला अशोक गिरी, सुनंदा मुतगेकर, वैशाली एकणेकर, राधिका मुतगेकर, राजु मुचंडीकर, सल्लागार समितीचे मोनाप्पा चौगुले, गजानन कोळूचे, मल्लेशी मुतगेकर, यलाप्पा दिवटे, सुभाष करविंकोप, प्रकाश बेडका, किसन कोळुचे, बसवंत मुतगेकर, शंकर मुचंडीकर, सुनील मायानाचे, सुनील निलजकर, शाळेचे सर्व आजी – माजी विद्यार्थि व ग्रामस्थ कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळा सुधारणा समितीच्यावतीने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.