बेळगाव : धारदार हत्याराने वार करून युवकाची निर्घृण हत्या केल्याची घटना बेळगावातील उद्यमबाग येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधातून हा खून झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
बेळगावातील मजगाव येथील आंबेडकर गल्लीतील रहिवासी २७ वर्षीय युवक यल्लप्पा शिवाजी कोलकार असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तीक्ष्ण हत्याराने भोसकून त्याचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. अनैतिक संबंधातून हा खून झाला असण्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. डीसीपी रवींद्र गडादी व उद्यमबाग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी उद्यमबाग पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेत तपास सुरु केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta