बेळगाव : मराठा समाजाच्या युवकांना उद्योग क्षेत्राकडे वळविण्याच्या उद्देशाने मराठी युवकांना संघटित करून व्यवसायाबद्दल असलेल्या अडीअडचणी दूर करून मार्गदर्शन करण्यासाठी मराठा सेवा संघ बेळगांव यांच्या वतीने रविवार दि. 3 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता मराठा युवा उद्योजक मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
गणेश कॉलनी संभाजीनगर, वडगांव येथील मराठा सभागृहामध्ये या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात मराठा समाज सुधारणा मंडळ बेळगावचे अध्यक्ष प्रकाश मारगाळे, माजी महापौर किरण सायनक, चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संचालक राजेंद्र मुतगेकर, शिवसंस्कार उद्योग मित्र गोव्याचे अध्यक्ष बी. एम. चौगुले, माजी नगरसेवक नेताजी जाधव, यश ऑटोचे मालक संजय मोरे, निवृत्त प्राचार्य महादेव कानशीडे, आर्किटेक्ट व अभियंते आर.एम.चौगुले, माजी मुख्याध्यापक शंकर पुन्नाप्पा चौगुले आणि मराठा मोर्चा बेळगावचे समन्वयक महादेव पाटील हे मान्यवर युवा उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta