Wednesday , March 4 2026
Breaking News

प्रा. गीता कुलकर्णी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

Spread the love

बेळगाव : गुरु-शिष्य ही परंपरा चालत आलेली, गुरुवंदनेने ज्ञान प्राप्ती होते याची, प्रचिती पंडित नेहरू पदवी-पूर्व महाविद्यालयाच्या हिंदीच्या प्राध्यापिका श्रीमती गीता कुलकर्णी यांच्या सेवानिवृत्ती समारंभात आली, असे गौरवोद्गार समाजसेविका श्रीमती शोभा लोकुर यांनी काढले.
प्रारंभी प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका सौ. सारिका पाटील उपस्थित होत्या. प्रारंभी ईशस्तवन आणि स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती ममता पवार यांनी उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून स्वागत केले. उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तद्नंतर महाविद्यालयाचे विद्यार्थी कु. श्रेयस कुंडेकर आणि भूषण नावगेकर यांनी गीता कुलकर्णी यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. माजी विद्यार्थी श्री. उदय पाटील यांनी माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेतर्फे गीता कुलकर्णी यांचा सत्कार केला. त्यानंतर महाविद्यालयाच्या वतीने शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन गीता कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रा. वाय. टी. मुचंडी, प्रा. एच. टी. जनगौडा यांनी गीता कुलकर्णी यांच्या सेवाकार्याचे कौतुक केले. नगरसेविका सारिका पाटील यांनी शिक्षक आणि शिक्षण यांचे जीवनात किती महत्त्व आहे हे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक श्री. प्रकाश नंदिहळ्ळी यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना गीता कुलकर्णी यांच्या कार्याचा आढावा घेत अनेक आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका चलवेटकर यांनी केले व शेवटी प्रा. सुरज यांनी उपस्थितांचे आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *