बेळगाव : बदलत्या युगामध्ये सर्वच व्यवसायांचे स्वरूप बदलते आहे. त्यामध्ये पत्रकारितेचा देखील समावेश आहे. नव्या युगामध्ये पत्रकारितेची नवी आधुनिक प्रणाली विकसित होत आहे. त्यामुळे नव्या पिढीला पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत, असे मार्गदर्शन स्मार्टन्यूजचे संपादक उपेंद्र बाजीकर यांनी केले. येथील गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या मराठी विभागातर्फे आयोजित पत्रकारिता आणि करिअर याविषयी या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील नव्या अभ्यासक्रमानुसार पत्रकारिता हा अभ्यासक्रम पदवी विद्यार्थ्यांसाठी शिकविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना उपेंद्र बाजीकर यांनी पत्रकारितेमधील नवी आव्हाने कशी वाढत आहेत याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच पारंपरिक चौकट मोडून पत्रकारितेचा व्यवसाय आधुनिक स्वरूपात विकसित होत आहे. यासाठी वेब पत्रकारिता आणि डिजिटल माध्यमांचा वापर करण्याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच या क्षेत्रातील अभ्यासक्रमांचीआणि रोजगार विषयक संधीची माहिती दिली. स्मार्टन्यूजच्या वतीने शिवाजी विद्यापीठ येथील ऑनलाईन जर्नलिझम अभ्यासक्रमाची माहिती केंद्रामध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच विद्यार्थी वर्गाने विचारलेल्या प्रश्नाला प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांचे शंका निरसन केले. कॉलेजमधील मराठी विषयाच्या प्रा. वर्षा कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी कॉलेजमधील प्रा. दत्ता कामकर आणि गीता चौगुले या व्यासपीठावर उपस्थित होत्या. त्यांनी देखील विद्यार्थ्यांना नव्या क्षेत्राची आव्हाने स्वीकारावीत असे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
Check Also
बेळगावात ‘वक्फ’साठी शांततेत मतदान
Spread the love बेळगाव : अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच राज्यातील वक्फ बोर्डाच्या निवडणुका बेळगावात शांततेत पार …