बेळगाव : हावेरी येथे न्यूज फर्स्टच्या बातमीदारावर हल्ला केल्याप्रकरणी नकली शेतकरी आंदोलक मंजुळा पुजारी हिच्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बेळगाव जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून मुख्यमंत्र्यांच्या नावचे निवेदन देण्यात आले.
हावेरी येथे न्यूज फर्स्टच्या प्रतिनिधींवर हल्ला केल्याच्या घटनेचा निषेध करून सोमवारी बेळगाव जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्या सदस्यांनी निदर्शने करून बनावट शेतकरी आंदोलक मंजुळा पुजारी हिच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या नावाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले. मंजुळा पुजारी हिच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, पत्रकारांवरील हल्ले रोखावेत, त्यांना योग्य सुरक्षा द्यावी आदी मागण्या या निवेदनात केल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ज्येष्ठ पत्रकार मुन्ना बागवान म्हणाले, पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. मात्र आज पत्रकारांवर हल्ले होत आहेत. हावेरी येथे वृत्तांकन करताना न्यूज फर्स्टच्या प्रतिनिधींवर आणि कॅमेरामनवर हल्ला करण्यात आला आहे त्याचा आम्ही निषेध करतो. सरकारने हल्लेखोरांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.
यावेळी बेळगाव जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे, उपाध्यक्ष राजशेखर पाटील यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
१९२४च्या काँग्रेस अधिवेशनामुळे स्वातंत्र्य चळवळीला बळ मिळाले : प्राचार्य आनंद मेणसे
Spread the love बेळगाव अधिवेशनाला १०० वर्षे पूर्ण निमित्त अंनिसतर्फे विशेष व्याख्यान बेळगाव : हिंदू …