बेळगाव : आज अरळीकट्टी, बसापूर, हुलिकवि, नेगेरहाळ, नंदिहळी, राजहंसगड, सुळगा. आदि गावामध्ये बेळगावच्या खासदार श्रीमती मंगला अंगडी यांच्याहस्ते जलजीवन मिशन योजनेची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात अरळीकट्टी येथून अरळीकट्टी मठाचे मठाधीश श्री शिवमूर्ती देवरु विरक्त मठ यांच्या अमृतहस्ते करण्यात आली. प्रसंगी भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष श्री. धनंजय जाधव म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजपा सरकार व श्री. बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक सरकार अनेक योजनांच्या माध्यमातून देशाचा विकास व जनतेच्या भल्यासाठी काम करत आहे. जलजीवन मिशन ही देशातील महत्त्वाची योजना आहे. प्रत्येक घरात शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे हा उद्देश आहे. याचा जनतेने लाभ घ्यावे, असे ते म्हणाले. या प्रसंगी खासदार मंगलाअंगडी म्हणाल्या, जलजीवन मिशन योजने बरोबरच केंद्र सरकारच्या सर्व योजना जनतेपर्यंत पोचवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन. याप्रसंगी चेतन अंगडी यांनीही आपले विचार मांडले.
यावेळी भाजपा सरचिटणीस श्री. पंकज घाडी, बसवराज दमनगी, निलकंठ पार्वती, रवी पार्वती, उळवापा चचडी, शिधापा हुकेरी, नारायण पाटील, जोतिबा थोरवत, नानाजी लोखंडे, रामनगौडा पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यानी भाग घेतला.
Check Also
१९२४च्या काँग्रेस अधिवेशनामुळे स्वातंत्र्य चळवळीला बळ मिळाले : प्राचार्य आनंद मेणसे
Spread the love बेळगाव अधिवेशनाला १०० वर्षे पूर्ण निमित्त अंनिसतर्फे विशेष व्याख्यान बेळगाव : हिंदू …