जे. के. फाउंडेशनतर्फे व्याख्यान, वृक्षारोपण आणि वृक्षवाटप
बेळगांव : मानव इतर सजीवांपेक्षा बुद्धीमान असला तरी तो सुद्धा पर्यावरणाचाच एक घटक आहे. हे विसरता कामा नये नैसर्गिक पर्यावरणात बदल घडवण्याची क्षमता केवळ मानवाकडे आहे. त्यामूळे पर्यावरणातील प्रत्येक घटकांचे संरक्षण करणे, त्याचा काळजीपूर्वक वापर करणे मानवाचे आद्यकर्तव्य आहे. हे आपण ओळखले पाहिजे. व पर्यावरणाचे रक्षण म्हणून प्रत्येकाने वृक्ष लागवड करुन त्याचे संवर्धन करावे व इतरांनाही प्रोत्साहित करावे. पर्यावरण वाचवा! जीवन वाचवा! देश वाचवा! या उक्ती प्रमाणे पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज झाली आहे, असे प्रतिपादन प्रमुख वक्ते समाजसेवक श्री. सुनील चौगुले यांनी “ग्लोबल वार्मिंग परिणाम आणि आजच्या काळात पर्यावरण संरक्षण संवर्धन काळाची गरज” या विषयावर व्याख्यानाच्या आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. कल्लाप्पा मोदगेकर होते.
जे. के. फाउंडेशन निलजी तालुका बेळगाव यांच्यावतीने सरकारी उच्च प्राथमिक शाळा निलजी आणि रणझुंजार हायस्कूल निलजी येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप आणि त्यानिमत्ताने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून प्रमुख वक्ते म्हणून समाजसेवक श्री. सुनील चौगुले यांचे “ग्लोबल वार्मिंग परिणाम आणि आजच्या काळात पर्यावरण संरक्षण संवर्धन” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष भरमानी कदम, सचिव आपाजी गाडेकर, फॉरेस्ट ऑफिसर श्री. सुभाष शेरखाने, प्रा. एन. एन. शिंदे, नारायण पाटील, अनंत मोदगेकर, शरद पाटील, पिराजी मोदकेकर, यल्लाप्पा पाटील, भरत वर्पे व्यासपीठावरती उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सुमधुर आवाजात स्वागतगीत आणि ईशस्तवनाने करण्यात आली.
स्वागत सुनिता जाधव यांनी तर प्रास्ताविक नारायण पाटील यांनी केले. परिचय सोनाली मुंगारी यांनी करून दिला. यावेळी समाजसेवक श्री. एन. व्ही. आपटेकर, सचिव आप्पाजी गाडेकर यांनी पर्यावरणासंदर्भात मौलिक विचार मांडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यापुढे विविध ठिकाणी जागृती अभियान राबवून पर्यावरण संरक्षण संवर्धन करण्यासाठी प्रत्येक शाळा महाविद्यालयात पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध कार्यक्रम हाती घेतले जाणार आहेत आणि विविध ठिकाणी झाडे वृक्षारोपण करून संवर्धन करण्यासाठी संस्था प्रयत्नशील राहणार आहे. संस्थेच्या वतीने विविध ठिकाणी 1000 पेक्षा अधिक वृक्षारोपण करून पर्यावरणाचा संदेश प्रत्येकांच्या मनामध्ये हा विचार बिंबविण्यासाठी संस्था प्रयत्न करणार आहे.
सूत्रसंचालन श्री. वैजनाथ नंजवडे यांनी केले. सद्याप्पा शहापूरकर यांनी आभार मानले.
यावेळी सागर गुंजीकर, सुधीर लोहार, प्रा. महादेव नार्वेकर, प्राचार्य पी. बी. पाटील, अनिल पाटील, प्रा. राजाराम हालगेकर नागराज पाटील, प्रा. एम. व्ही. शिंदे, प्रा. आर. एम. मोहिते, पिराजी मोदगेकर, अनंत मोदगेकर, कलाप्पा मोदगेकर, योगेश मोदगेकर, गाजानन मोदगेकर तसेच संस्थेचे पदाधिकारी सदस्य प्राध्यापक शिक्षक कर्मचारी विद्यार्थी पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.