बेळगाव : माळमारुती येथील लव्हडेल सेंट्रल शाळेच्या स्पोर्टिंग प्लॅनेट टर्फ फुटबॉल मैदानावर विद्याभारती कर्नाटक यांच्या मान्यतेने संत मीरा इंग्रजी माध्यम शाळा आयोजित बेळगाव जिल्हास्तरीय विद्याभारती फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ झाला.
या स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडाभारती राज्य सचिव अशोक शिंत्रे, बेळगाव जिल्हा संयोजक विश्वास पवार, बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव अमित पाटील, बेळगाव जिल्हा विद्याभारती अध्यक्ष राघवेंद्र कुलकर्णी, संत मीरा शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, विद्याभारती जिल्हा शारिरीक शिक्षक प्रमुख चंद्रकांत पाटील, निरंज सावंत स्पोर्टिंग प्लॅनेटचे संचालक मतीन इनामदार उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती, ओमकार, भारतमाता फोटोपूजन व दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. अशोक शिंत्रे यांनी श्रीफळ वाढवले.
याप्रसंगी अशोक शिंत्रे, अमित पाटील, आर. के. कुलकर्णी, सुजाता दप्तरदार या मान्यवरांनी खेळाचे महत्व व विद्याभारतीच्या विविध उपक्रमाची माहिती दिली.
यानंतर जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ झाला सदर स्पर्धेत संत मीरा इंग्रजी माध्यम स्कूल, बेळगांव, शांतिनिकेतन स्कूल, स्वामी विवेकानंद स्कूल खानापूर, देवेंद्र जिनगौडा स्कूल शिंदोळी या संघाच्या प्राथमिक व माध्यमिक संघानी या स्पर्धेत भाग घेतला आहे.
याप्रसंगी क्रीडाशिक्षक ओमकार गावडे, प्रशांत वाडकर, मंजुळा हंपनन्नावर, स्नेहलता ढबाले, बसवंत पाटील, स्वरा आजनकर, प्रियंका पाटील, साई बसरीकट्टी, पंच मानस नायक, योगेश सावगांवकर, ओमकार सावगांवकर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta