ब्राह्मण समाजाच्यावतीने निदर्शने
बेळगाव : कलबुर्गी जिल्ह्यातील सेडम तालुक्यातील कागीना नदीच्या तीरावरील श्री जयतीर्थाच्या मूळ वृंदावनाबद्दल काही लोकांकडून होणारा अपप्रचार थांबवावा आणि तो करणार्यांवर सरकारने कारवाई करावी, या मागणीसाठी बेळगावात ब्राह्मण समाजातर्फे आज आंदोलन करण्यात आले.

कोप्पळ जिल्ह्यातील गंगावती तालुक्यातील अणेगोंडी येथील नव वृंदावन येथे रघुवर्य तीर्थाच्या वृंदावनाला जयतीर्थाचे वृंदावन मानून 17, 18 आणि 19 जुलै रोजी पूजा करण्याचा घाट काहींनी घातला आहे. त्याच्या निषेधार्थ आणि सरकारने तो हाणून पाडावा बेळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ब्राह्मण समाजाच्या नेत्यांनी आज गुरुवारी निदर्शने केली.
आंदोलनात श्रीनिधी आचार्य, नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती, शिवनगी, श्रीधर हुक्केरी, राजेंद्र कुलकर्णी, भीमसेन मिर्जी यांच्यासह ब्राह्मण समाजाचे इतर नेतेही सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta