बेळगाव : बेळगावात शुक्रवारी सकाळी झालेल्या 2 अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. तर अन्य एका घटनेत एक युवक गंभीर जखमी झाला आहे.
रस्त्याच्या सफाईच्या कामात गुंतलेल्या महिलेचा कारच्या धडकेत मृत्यू झाला आहे. अनिता राजेश बन्स ( वय ५६) असे त्या महिलेचे नाव आहे ती आनंदवाडी पिके कॉर्टर्स येथील रहिवासी होती.
शहरातील बसवेश्वर सर्कलजवळील एलआयसी कार्यालय परिसरात ही घटना घडली.
कचरा साफ करणाऱ्या महिलेच्या अंगावर कार गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. सदर महिलेच्या कुटुंबीयांनी ही घटना समजताच एकच आक्रोश केला. संतप्त कुटुंबीयांनी त्या कारचालकाला चांगला चोप दिला. तसेच त्याला पोलिसांकडे सुपूर्द केले. टिळकवाडी पोलीस ठाण्याने तपास केला.
दरम्यान, दुसऱ्या एका अपघातात बेळगाव-बागलकोट मुख्य रस्त्यावर बेळगाव तालुक्यातील बाळेकुंद्री-होन्निहाळ गावांदरम्यान दुसरा अपघात झाला.
माविनकट्टी गावातील 35 वर्षीय महांतेश सनदी असे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या अपघातात जखमी व्यक्तीचे दोन्ही पाय चिरडले गेले असून त्याला पुढील उपचारासाठी बेळगाव जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. मारिहळ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta