बेळगाव : बेळगावमधील अनगोळ येथील पाच भाविक सेल्टोस गाडीने पंढरपूरकडे येत असताना रविवारी पहाटे कासेगाव फाटा (ता. पंढरपूर) येथे अपघात झाला. या अपघातात दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत.
या अपघातात राजू संभाजी शिंदोळकर (वय ४५, रा. अनगोळ, ता. बेळगाव), परशुराम संभाजी झंगरूचे (वय ५० रा. अनगोळ ता. बेळगाव) हे भाविक मयत झाले आहेत. तर अभिजीत हुंदरे (वय २८, रा. अनगोळ ता. बेळगाव), गीतेश पोकंशेकर (वय २६, रा. अनगोळ ता. बेळगाव), राजकवि कृष्णा मधुकर (वय २३, रा. अनगोळ ता. बेळगाव) हे भाविक जखमी झाले आहेत.
मयत भाविकांबाबत त्यांच्या नातेवाईकांना कळवण्यात आले आहेत. तसेच जखमी भाविकांवर पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
