बेळगाव : सीनियर आयएएस अधिकारी बेळगावचे प्रादेशिक आयुक्त आणि बिम्सचे संचालक असलेले आदित्य आम्लान बिश्वास यांची बेळगावमधून बदली करण्याचा आदेश राज्य सरकारने बजावला आहे.
सोमवारी सायंकाळी कर्नाटक राज्यातील अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा आदेश राज्य सरकारने काढला असून त्यात बेळगावचे प्रादेशिक आहेत आयुक्त आदित्य आम्लान बिश्वास यांचा समावेश आहे. विश्वास आता बेंगळूरचे रीजनल कमिशनर असणार आहेत. बेंगलोरचे प्रादेशिक आयुक्त नवीन राजसिंह यांच्या जागी ते पदभार स्वीकारणार आहेत.
गेल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी बेळगावसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले होते. कोरोना काळामध्ये बिम्सचे वाभाडे निघाले होते त्यानंतर जून 2021 मध्ये तात्कालीन मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा यांनी बिश्वास यांच्याकडे बिम्स संचालक पदाची धुरा दिली होती त्यानंतरचं इस्पितळ प्रशासनात अमूलाग्र बदल घडवत त्यांनी सुधारणा केली होती आणि या दोन वर्षांमध्ये बिम्सचा देशात सातवा क्रमांकांवर आणून ठेवलं आहे त्याचे बऱ्यापैकी श्रेय बिश्वास यांना जाते.
Belgaum Varta Belgaum Varta