
बेळगाव : पावसाळ्याच्या दिवसात पॉवरमनकडून मिळणारी सेवा हि अत्यंत महत्वपूर्ण असते. जीव धोक्यात घालून जनतेला सेवा पुरविणाऱ्या पॉवरमनसाठी लक्ष्मीताई फाउंडेशनच्या वतीने रेनकोटचे वितरण करण्यात आले. बेळगाव तालुक्यातील सुलगा येथील लावण्य हॉल येथे आयोजिण्यात आलेल्या कार्यक्रमात बेळगावच्या केईबी विभागातील पॉवरमनना विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्याहस्ते रेनकोट वितरित करण्यात आले.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना चन्नराज हट्टीहोळी म्हणाले, पॉवरमन हे नाव डी. के. शिवकुमार यांनी आपल्या ऊर्जामंत्री कार्यकाळात दिले आहे. आपण ज्यांना लाईनमन म्हणून ओळखतो त्यांनाच डीकेशींनी पॉवरमन असे नाव दिले. २००४ पासून २०१८ पर्यंत ऊर्जा विभागात अनेक बदल घडले. अनेक विकासपर उपक्रम राबविण्यात आले. आता आमदार लक्ष्मी हेब्बाळकरांनी विश्वास दर्शवून काळजी आणि प्रेमापोटी पॉवरमनसाठी रेनकोट वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्यासोबत आपण सातत्याने असेच राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी एपीएमसी अध्यक्ष युवराज कदम, ग्राम पंचायत अध्यक्ष रघुनाथ खंडेकर, सदस्य भागण्णा नरोटी, जयवंत, बसनगौडा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर, पॉवरमन उपस्थित होते. लक्ष्मीताई फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत होते.
Belgaum Varta Belgaum Varta