Tuesday , March 3 2026
Breaking News

कन्नड चित्रपट अभिनेते शिवरंजन यांच्यावर गोळीबार; थोडक्यात बचावले!

Spread the love

 

बेळगाव : बैलहोंगल शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती, कन्नड चित्रपट अभिनेते शिवरंजन बोळण्णावर यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार करूनन पळ काढला. मात्र बोळण्णावर किंवा इतर कोणालाही कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याची माहिती उपलब्ध आहे.
गोळीबार करणाऱ्यांपैकी एक त्याच्या भावाचा नातेवाईक असल्याची माहिती आहे. बैलहोंगल येथील मारूती देवळाजवळील शिवरंजन यांच्या जुन्या घराजवळ हा गोळीबार झाला. रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील, अपर पोलीस अधीक्षक महानिंग नंदगावी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला असून, जुन्या वादातून गोळीबार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस तपासातून या हल्ल्यामागील नेमके कारण कळणे गरजेचे आहे.
या घटनेमुळे संपूर्ण बैलहोंगल शहर हादरले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *